सेंट झेवियर स्कुलच्या मृणाल शिंदेची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

0
323

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षातील मुलींच्या गटात सेंट झेवियर्स स्कूलची विद्यार्थिनी मृणाल दिनकर शिंदे ही तालुकास्तरावर प्रथम आली आहे. तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून ती गेवराई तालुक्याची प्रतिनिधी म्हणून या स्पर्धेत खेळणार आहे.
दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी गेवराई येथील र भ अट्टल महाविद्यालय येथे विविध तालुकास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते 17 वर्षे आतील मुलींच्या वयोगटात सेंट झेवियर्स स्कूल मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मृणाल दिनकर शिंदे हिने अटीतटीची लढत देऊन तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 14 वर्षातील गट (मुली) अनुष्का लक्ष्मीकांत येवलेकर, विद्या शिवप्रसाद पोपळघट, अक्षरा बसवेश्वर मोरतुले यांनी तर 14 वर्षातील गट (मुले) या गटात वरद प्रभाकर चाळक यांनी बाजी मारली. यशस्वी खेळाडूंना शरद साळवे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी वरील विद्यार्थ्यांसह बुद्धिबळ स्पर्धेच्या विविध गटात तालुक्यातील इतर शाळेचेही काही विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. आता हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत गेवराई तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य फादर पीटर खंडागळे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल भालेकर, कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक पत्रकार दिनकर शिंदे, परिवेक्षक दीपक देशपांडे, विजय भोसले आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here