सलग दोन वेळा ग्रामसभा रद्द करण्याची माणुसकी जातेगावच्या ग्रामपंचायत वर !
जातेगाव :
मागील वेळी देखील सुध्दा २२ ऑगस्ट ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेची नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १५ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही, मागील ग्रामसभेला देखील ग्रामसेवकावर कारवाई करा म्हणतात सरपंच महोदयांनी ग्रामसभा केली होती रद्द, वारंवार ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त होत आहे.
ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने ग्रामसभा रद्द
गावकऱ्यांचा कुलूप ठोको आंदोलनाचा देणार इशारा : जातेगाव येथील प्रकार
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे २ ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. गांधीजींना पुष्पहार अर्पण जयंती साजरी करण्यात आली यानंतर ग्रामसभा होणार होती. परंतु ऐन महत्त्वाच्या कार्यक्रमात ग्रामसेवक गैरहजर होते, त्यांच्या जागेवर सचिव म्हणून वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती मात्र ते देखील अनुपस्थित राहिल्याने, ग्रामसभा झालीच नाही. ग्रामसेवक नेहमीच अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सभांना गैरहजर राहत असल्याने गावकरी चांगलेच संतापले आहेत. येत्या आठ दिवसात ग्रामसेवकावर कारवाई न केल्यास ग्रामपंचायला कुलूप ठोकण्याचा इशारा त्रिंबक सोपान चव्हाण, नारायण आश्रुबा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ देणार आहेत. मागील ग्रामसभेला सुध्दा २२ ऑगस्ट ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेची नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाहीत, त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १५ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे. तात्कालीन ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांना चार्ज सोडला आहे असे दाखवले नाही, त्यामुळे नवीन रुजू होत असलेले ग्रामसेवक पांडुळे हे म्हणतात की जातेगाव चा चार्ज अजून मी घेतलेला नाही त्यामुळे मी जातेगाव ला येत नाही. मात्र ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांना हिशोब द्यायचा नसल्याने ते बहाणा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. येत्या आठ दिवसात गावकऱ्यांना हिशोब देण्यात यावा. अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.