गेवराई (प्रतिनिधी) मराठा बांधवांनी आपल्या गावा गावांमध्ये युवक बांधवांची बैठक घेऊन येणार्या 14 तारखेला होणाऱ्या महा जनआक्रोश सभेला लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
युवक बांधवांनी गावनिहाय नियोजन टीम तयार करावी. टीम मध्ये सर्व नवतरुण युवक बांधवांनी एक – एक ग्रुप काळजीने बनवावा आणि प्रत्येकांचे संपर्क नंबर प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे आपले नियोजन 10 तारखेच्या आत झाले पाहिजे आणि या संदर्भातील एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे तरी आपण जास्तीत जास्त समाज बांधवांनी दि. 5 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वा. गेवराई तील कोल्हेर रोड येथील बेदरे लॉन्स येथे उपस्थित रहावे. व 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे होणा-या महा जनआक्रोश सभेला लाखोच्या संख्येने मावळ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटना तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे उपाध्यक्ष शिवश्री शाम गायकवाड (पाटील) यांनी केल आहे.