बीड / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना येत्या रविवारी (दि.२४) सप्टेंबर रोजी सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कार्यक्रमाच्या तत्पूर्वी मंत्री रामदास आठवले बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. अशी माहिती युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शनिवार (दि.२३ मे ते २ जून दरम्यान तालुकानिहाय मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण अठराशे ऐंशी लाभार्थी तपासणी शिबिरात पात्र ठरले आहेत. रविवारी (दि.२४) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीड शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील माँ वैष्णोदेवी पॅलेस या ठिकाणी केज आणि बीड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना निःशुल्क सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात येणार आहे. या
वितरण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती
युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.