गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील मन्यारवाडी शिवारात एका शेतात मनोहर विलास पुंड यांचा आज दि.28 सोमवार रोजी खुन झाल्याची माहिती तपासात उघडकीस आली.सविस्तर वृत्त असे की शहरात अनेक विचित्र घटना घडत असल्याचे दिसत आहे असे असताना गेवराई येथील एका शेतशिवरात सख्ख्या भावाने मित्राच्या मदतीने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना घडली असून तपासानंतर मयताचा भाऊ दर्शन पुंड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की दररोज दारू पिऊन येऊन नाहक त्रास देत होता या सर्व बाबींना वैतागून माझा सहकारी मित्र माऊली आनंद बाप्ते सदरची माहिती दिली. त्यानंतर शेतशिवारात नेऊन त्यास बेदम मारहाण केली अशी कबुली दर्शन पुंड यांनी दिली गेवराई पोलीस ठाण्याचे उगलमुगले यांच्या फिर्यादीवरून दर्शन विलास पुंड, माऊली बाप्ते यांच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके करत आहेत.