गेवराई( प्रतिनिधी )गेवराई तालुक्यातील सुशी शिवारात पवनचक्की च्या तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती प्रकरणी रवींद्र विलासराव जायभाय सुरक्षा अधिकारी पवनचक्की राहणार बीड यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाचा पोलीसांनी छडा लावला असुन संबधीत चोरटे ताब्यात घेतले आहे
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील सुशी शिवारात पवनचक्की मधील तांब्याच्या तारेची चोरी दि 25,26 जुलै रोजी झाली होती प्रकरणी गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीसानी तपासाची चक्रे फिरवली शिवारात पवनचक्की वायर चोरण्यासाठी चोरटे आले असल्याची माहिती पोलीसांना मीळाली माहिती वरुण सापळा रचुन ठिकाणी घेराव घातला या वेळी चोरटे मोटरसायकली सोडून पळाले पाठलाग केला यात आरोपी, विनोद मोहन चव्हाण वय 22 वर्षे राहणार उस्मानाबाद, ताब्यात घेतले ईतर साथीदारांची चोकशी केली मुद्देमाल उस्मानाबाद येथील रशीद बशीर शेख, विकल्याचे सांगितले आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन पळालेल्या इतर दहा साथीदारास गुन्हा केल्याचे कबूल दिली मोहन चव्हाण गुन्ह्यात अटक करण्यात आली आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकासह सपोनी जंजाळ, फौजदार गरजे हवलदार देवडे उस्मानाबाद जावुन फरार आरोपीचा शोध घेतला भंगार दुकानदारालाा तार विकली त्या दुकानाची झडती घेतली असता दुकानांंत गुन्ह्यातील 120 किलो तांब्याची तार किंमत 60 हजार रुपयाची मिळून आली दुकान मालक रशीद बशीर शेख वय 43 वर्ष राहणार जुना बस डेपो उस्मानाबाद यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.आरोपीने असे प्रकारचे गुन्हे केले आसल्याची शक्यता आहे कारवाई पोनि फराटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सफौ् गरजे देवडे, परजणे, अदीचा समावेश होता