गेवराई प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची निवड पोलीस दलात झाली आहे. यामध्ये विठ्ठल सागडे, अशोक राठोड, सिताराम नाईक, सुनील पवार, विशाल वाघमोडे, गजेंद्र कांबळे, ब्रह्मदेव वायभसे यांचा समावेश असून महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विविध उपक्रम राबवते. यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ट्रेनिंग व परिसर मुलाखती तसेच व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना दिली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये आपल्या आवडीनुसार करिअर निवडताना मदत होते.
यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
पोलीस दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी उपप्राचार्य प्रो. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, राजेद्र राऊत, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, डॉ. प्रवीण सोनुने, डॉ. सुनिल भगत, डॉ. बालाजी रुपनर, डॉ. रणजीत पागोरे डॉ. हनमंत हेळंबे उपस्थित आदींची उपस्थिती होती.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230717-WA0033-1-682x1024.jpg)