गेवराई (शुभम घोडके) सावता नगर येथील रहिवासी गॅरेज युनियनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक संजय रामभाऊ वादे (वय ५४) यांचे बुधवार दि.२१ जुन रोजी बीड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
संजय रामभाऊ वादे यांचे बुधवार दि. २१ जुन रोजी सायंकाळी ५.३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. २१ रोजी सायंकाळी १० वाजता चिंतेश्वर स्मशानभूमी, येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भाऊजाई , दोन मुले, मुली असा परिवार आहे. गॅरेज कामात ते नेहमी सक्रिय असायचे गेल्या अनेक वर्षांपासून ते काम होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोतावळा जमविला होता. त्यांच्या अकस्मात निधन वार्तेमुळे अनेकांना धक्का बसला असून संपूर्ण गेवराई तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.