सहकार क्षेत्रातला कोहिनूर हिरा-अमोल गाडेकर

0
570

मेहनत आणि प्रयत्नाच्या बळावर आपण आपल्या कर्तुत्वावर यशाचे गमक गाठत असतोत पण स्वतः केलेली कामे कधीही वाया जात नाही हेही तितकेच खरे असुन संकाटातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो तोच खरा माणुस असतो. आयुष्यात काही तरी करुन काही मिळवायचेच अशी जिद्द असलेली माणसे सतत कार्यरत असतात जिद्दीने व्यवसायाला सहकार क्षेत्रात उभारी घेणारे व्यक्तिमत्त्व त्या दिशेने प्रयत्नही करतात आणि दुसऱ्याने दाखविलेल्या मार्गावर चालणे खूप सोपे असते. त्यांनी अनेक संकटांचा आणि अडचणींचा सामना केलेला आहेच हे आपल्याला ठाऊक असते, पण त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव घेता येत नाही. म्हणून यासाठी नेहमी नवीन मार्गावर चालणे गरजेचं असतं. सातत्य ठेवल्याने संकटाला ही सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते .शेतकरी ते चेअरमन असा थक्क करणारा प्रवास म्हणजे एक उदाहरण म्हणजे आदिनाथ अर्बनचे अमोल राधाकिसन गाडेकर होय.

अंबड तालुक्यातील वडीकाळा हे अमोल राधाकिसन गाडेकर यांचे गाव असून जवळपास भरपूर लोकवस्ती असलेलं छोटसं गाव आहे त्या गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात गावात वेगवेगळे सामाजिक धार्मिक सलोख्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. विविध भागातून ,तालुक्यातून त्या उत्सवासाठी लोक हजेरी लावतात. या गावाची नावलौकिकता जालना जिल्हा भरात असताना अशा या गावात अमोल गाडेकर यांचा जन्म झाला.वडील राधाकिसन गाडेकर शेती काम करून कुटुंबाचा उद्धार निर्वाह भागवत होते. अमोल गाडेकर यांचे मत्‍स्‍योदरी विद्यालय अंकुश नगर येथे दहावीपर्यंत शिक्षण झाले. आता आपण वडिलांना मदत करू असा संकल्प त्यांनी केला. शेती कामाला सुरुवात केली शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण उद्योग व्यवसायात आले यावं हा मनाचा ठाव घेत, ध्यास घेऊन त्यांनी सहकार क्षेत्रात आपण उद्योग व्यवसाय करूया आणि अर्थकारण करूया.. म्हणून वारकरी संप्रदायातील आदिनाथ या नावाचा अर्थ असा होतो की नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात पहिला तसेच सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त असणारं नाव आहे म्हणून सुखापुरी येथे पहिल्या शाखेचे उद्घाटन संत महंत- मान्यवर यांच्या शुभहस्ते दि.24/06/2019 आदिनाथ उद्योग समूहाची स्थापना करण्यात आली .अवघ्या 25 हजार रुपयात आदिनाथ अर्बन या संस्थेची सुरुवात केली आज पाहता संस्थेने दहा कोटीचा टप्पा पार केला . संस्थेचे चे ब्रीदवाक्य तेथे पैसा आणि विश्वास दोन्हीही वाढत जातो. अवघ्या दोन एकर शेती वरती संस्थेची सुरुवात देखील त्यांनी केली संस्था सुरू करायच्या अगोदर अमोल गाडेकर यांनी कमीत कमी आठ चांगल्या पदाच्या व चांगल्या पगारीच्या नोकऱ्या सोडल्यात एमबीए मार्केटिंग करून पुन्हा शेतीकडे वळाले व शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती यशस्वी करून त्यांनी दाखवली.शेती करता वेळेस शेडनेट उत्पादन मिळवले तसेच अनेक विविध असे अत्याधुनिक प्रयोग आपण शेतामध्ये केले लोकांनाही दाखवलं की शेती ही पैसा कमावण्याचा चांगलं साधन आहे म्हणून मग शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आर्थिक कारण मग या गोष्टीची जाणीव ठेवून संस्थेच्या माध्यमातून उद्योग समूहाची स्थापना केली व त्यांच्या माध्यमातून आदिनाथ अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हि पतसंस्था पंचक्रोशीत एक नावलौकिक बँक झाली . तसेच साखर कारखान्याचे उसाचे बिलही आदिनाथ अर्बन संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते.व सर्वसामान्य दुकानदारांचे शेतकऱ्याचे प्रश्नही सोडवतो महिलांना स्वयंलंबी, बनवण्यासाठी सहकार्य अपेक्षित असते म्हणून सातत्याने मदत करण्याची हेतू ठेवला.अडीच हजाराच्या आसपास सभासद झाले आहेत भरघोस असा प्रतिसाद मिळाला तसेच पंचक्रोशीतील महिलांची मोलाची साथ आदिनाथ अर्बनला लाभली खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या माता -भगिनींनी आदिनाथ अर्बनला आर्थिक पाठबळ निर्माण करून दिले कुटुंबामधून आई-वडिलांनी त्यांना उद्योग उभारणीमध्ये साथ दिली अर्धांगिनी सौ.अमृता अमोल गाडेकर पदोपदी व अनेक संकटामध्ये त्यांच्यासोबत खंबीर अशा उभ्या आहेत. त्यांचे वडील राधाकिसन गाडेकर हे साखर कारखान्यामध्ये छोटीशी नोकरी करतात असो गावातील ग्रामस्थ ,सर्व मंडळी सुखापुरी- वडीकाळ्यातील मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.असो बँकेच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या 15 ते 20 तरुणांना रोजगार निर्मिती केली तसे अप्रत्यक्षरीत्या आदिनाथ अर्बन येणाऱ्या कालावधीमध्ये 100 महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम हाती घेतला आहे. आदिनाथ अर्बन उद्योग उभारण्यामध्ये श्री.दिगांबर टेकाळे चेअरमन( सहयोग मल्टीस्टेट )यांनाही मोलाचे मार्गदर्शन केले तसेच श्री मयूरराजे वैद्य (चेअरमन भगवानबाबा, मल्टीस्टेट )खंबीर अशी पाठराखण केली.
छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन श्री संतोष (नाना )भंडारी यांनी उद्योग व्यवसायाबद्दल अनेक वेळा मार्गदर्शन केले. आमचे मित्र श्री. ज्ञानेश्वर उडदंगे विश्वंभर जी येवले राधेश्यामजी राठोड , चंद्रकांत राऊत यांच्या सह अनेकांनी चेअरमन अमोल गाडेकर यांना सहकार्य केले. व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आदिनाथ अर्बन नेहमी आदिनाथ अर्बन सर्वाच्या सुखात आणि दुःखात सहभागी असतात असो समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड चे मागील वर्षे आर्थिक वर्षात काही गावाच्या उसाचे बिल आदिनाथ अर्बनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या शेतकऱ्यांची होणारी हेडसांड थांबली. तसेच धार्मिक कार्यात सहभाग घेऊन आदिनाथ अर्बन च्या माध्यमातून सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक असे उपक्रम चालू असताना श्री.संगमेश्वर लखमापुरी.अखंड हरिनाम सप्ताह च्या वेळेस व श्रावण भक्तांसाठी सोय केली जाते दरवर्षी वडीकाळा येथील श्री. नरसिंह जयंती साजरी करण्यात येते‌ तसेच अनेक छोटे -मोठे अध्यात्मिक उपक्रम आदिनाथ अर्बनच्या माध्यमातून केले जातात. अमोल गाडेकर खूप प्रांजळ स्वभावाच्या आहेत. गाडेकर परिवाराला सुख समृद्धी व हीच श्रीचिंतेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आदिनाथ अर्बन या संस्थेला भरभराटी यावो अशा सदिच्छा देतो.

-लेखक शुभम घोडके ( उपसंपादक गेवराई)
मो.8308390008





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here