गेवराई (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला निधी देण्यात यावा अशी मागणी करून याचा सतत पाठपुरावा केल्याने या मागणीची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री ना.भारतीताई पवार तालुक्यातील निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी 5 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. याबद्दल आ.लक्ष्मण पवार यांनी ना.भारतीताई पवार व सचिव ओमप्रकाशजी शेटे साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत. तर लवकरच ही सुसज्ज ईमारत उभी राहणार असून याठिकाणी ग्रामीण भागातील रुग्णांना तत्पर सेवा मिळेल असा विश्वास आ.पावर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र अनेक ठिकाणी ईमारती व कर्मचारी यांचा अभाव आसल्याने सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याच धर्तीवर तालुक्यातील निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारत बांधकामासाठी आपण प्रस्ताव सादर करून ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल केंद्रीय आरोग्यमंत्री ना.भारतीताई पवार यांनी या आरोग्य केंद्राच्या ईमारती साठी 2 कोटी 76 लाख रुपये व निवासस्थानासाठी 2 कोटी 87 लाख रुपये असे मिळून एकूण 5 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आसून ही रक्कम चालू आर्थिक वर्षात अर्धी आणि पुढील आर्थिक वर्षात अर्धी अशी दोन टप्प्यात मिळणार असून लवकरच या कामाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तसेच या आरोग्य केंद्रात दोन मेडिकल ऑफिसर सह एकूण पाच कर्मचाऱ्यांचा स्टाफ 24 तास रुग्णांच्या सेवेत हजर राहील. यामुळे आता निपाणी जवळका व परिसरातील ग्रामीण भागात रुग्णांना याच ठिकाणी तत्पर सेवा मिळेल असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी व्यक्त करत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री ना.भारतीताई पवार व सचिव ओमप्रकाश शेटे यांचे आभार मानले आहेत.
Home Uncategorized आ.लक्ष्मण पवारांच्या पाठपुराव्याला यश निपाणी जवळका येथील प्रा.आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी 5 कोटी...