अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी मानवत पो.स्टे मध्ये गुन्हा दाखल

0
377

पोक्सो सह अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

मानवत / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील मौ. हमदापुर येथील एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनं अंतर्गत एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की मानवत तालुक्यातील मौ. हमदापूर येथील १२ वर्षीय पीडित मुलगी ही गावातील किराणा दुकानात सामान आनण्यासाठी गेली असता गावातील शिवाजी कारभारी शिंदे वय (वर्षे ३५ ) व्यवसाय टेलर याने पीडितेस तुझ्या नावाचे कपडे आले आहेत मला तुझ्या कपड्याचे माप घ्यावयाचे आहे असे म्हणत दुकानात बोलावून वाईट उद्देशाने छेडछाड केली व पीडीतेचा भावास दुकाना बाहेर उभे राहण्यास सांगितले व पीडीतेचा कपड्याचे माप घेण्याच्या बहाण्याने अती प्रसंग करण्याचा प्रयत्न केला सदरील घडलेला प्रकार कोणाला सांगू नको अन्यथा तुला व तुझ्या भावास जीवे मारीन असे म्हणत धमकी दिली हा प्रकार २९ मे रोजी सायंकाळी घडला असून याबाबत पिडीत मुलीचा आईचा फिर्यादीवरून शिवाजी कारभारी शिंदे वय वर्षे ३५ यांच्या विरुद्ध मानवत पोलीस स्टेशनं अंतर्गत ३० मे रोजी भां. द. वि कलम पोक्सो कायदा व अनुसूचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here