खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून युवकांने घेतले विष

0
1666

गेवराई शहरातील प्रकार;युवकांची प्रकृती चिंताजनक

गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई शहरातील तय्यब नगर भागातील एका युवकांने खाजगी महिला सावकारांच्या जाचांस कंटाळून एका युवकांने विष घेतले असल्याची घटना ( दि 28 रोजी ) घडली असुन या युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असुन यावर बीड च्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत

याबाबद सविस्तर माहिती अशी की , शेख आसेफ नियाजोद्दीन ( वय 30 वर्ष ) राहणार तय्यब नगर गेवराई जि बीड असे या युवकांचे नाव असुन तय्यब नगर भागातील रहीवासी असलेल्या एका महिला सावकार यांच्याकडून पैसे घेतले होते.ते पैसे उसतोडणी वरूण आल्यानंतर परत करतो असे या युवकांने सांगितले परंतू सावकार व तीच्या पतीने जबरदस्ती मारहाण करूण उपजिविका भागवण्याचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले व चार लाख रूपये आनूण दे असे सांगितले यानंतर या युवकांने टोकाचे पाऊल उचलले व विष प्राशन केले आहे त्याला तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करूण बीड येथे हलवण्यात आले आहे तसेच या युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते तसेच याबाबद या युवकांने सावकारांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here