गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्रात दहा महिन्यापुर्वी शिवसेना भाजपा युती सरकार स्थापन झाले तेव्हा पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले तेव्हा गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला आहे त्यामुळे गेवराई शहरासह विधानसभा मतदारसंघात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत येणाऱ्या वर्षात केद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा म्हणून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आ. लक्ष्मण पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी बोलताना आ. लक्ष्मण पवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जलजीवन योजना गेवराई विधानसभा मतदारसंघात आली आहे पण महाविकास आघाडीच्या काळात एक रुपया सुध्दा न आनणा-या पंडीत मात्र जलजीवन योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन करत आहेत पण थाटा माटात जलजीवन योजनेचे उद्घाटन करणा-या पंडितांनी निधी कोणी दिला आहे हे जनतेला एकदा तरी सागांव असे आ. लक्ष्मण पवार म्हणाले आहे
मतदार संघातील चकलांबा व बोरगाव जुने या या ठिकाणी आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या प्रयत्नातून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्याअनुषंगाने चकलांबा फाटा ते चकलांबा गावासाठी १३ कोटी रुपये निधी मध्ये ७.६६ कि.मी डांबरीकरण रस्ता तसेच बोरगाव जुने फाटा ते बोरगाव येथील येथील रस्त्यासाठी दोन कोटी ५८ लक्ष लाख रुपये २.५५ कि. मी. डांबरीकरण कामाला मंजूर मिळालेली आहे त्या रस्त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आ. लक्ष्मण आण्णा पवार यांचे कौतुक होत आहे
चकलांबा व बोरगाव येथील डांबरीकरण रस्ता कामाला मंजुरी मिळालेल्या विकास कामाला दिनांक 27 मे शनिवार रोजी संध्याकाळी आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे
गेवराई विधानसभा मतदारसंघातील चकलांबा फाटा ते चकलांबा तसेच बोरगाव फाटा ते बोरगाव जुने डांबरीकरण रस्ता कामाचा शुभारंभ आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे यावेळी युवानेते शिवराज पवार, याहीया खान, शाम कुंड, मा. जि.प.सदस्य अरविंद जाधव, सत्येजित जाधव, मा. सरपंच गणु खेडकर, महेश आहेर, संदिप कु-हाडे, रवि, आहेर, बंडु गवारे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शकील भाई, प्रकाश खेडकर, संदीप रोकडे,कुडंलीक गुंजाळ, शेखर काळे, ईर्शाद भाई, पप्पू खेडकर,राजु नागरे, रावसाहेब काळे, प्रल्हाद येळापुरे, जिजा कवचट, गौरव खरात, मा सरपंच संदिप जाधव, गोवर्धन मस्के, महेश चेके, श्रिहारी गंगाधर, गोर्डै, माऊली खराद, बळीभाऊ करे आदिची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती