दक्षिण भारत भटकंती चे स्वप्नपूर्ती आई सह दिव्यांग अंजना प्रधान सहभागी दिव्यांग अंजना प्रधान यांच्या सह 37 दिंव्यांगाना दक्षिण भारतात भटकंतीचा योग

0
156

नांदेड प्रतिनिधी; उज्वला गुरसुडकर

राज्यातील दिव्यांगांसाठी दक्षिण भारतातील कन्याकुमारी, रामेश्वरम् व मदुराई या ऐतिहासिक ,धार्मिक व सागरी ठिकाणाची भटकंती मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत करण्यात आली होती. शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील अंध अपंगांची दुर्ग भ्रमण संवर्धन संस्था आहे महाराष्ट्राच्या बाहेर अर्थात दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात दिव्यांगांसाठी भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 11 मे ते दिनांक 18 मे 2023 दरम्यान आयोजित या भट्कंती मोहिमेत राज्यातील पुणे ,नाशिक,बीड ,अकोला ,
छत्रपतीसंभाजीनगर ,अहमदनगर ,सोलापूर ,सांगली, नागपूर ,मुंबई, संगमनेर या जिल्ह्यातील विविध प्रकारच्या 37 दिव्यांगांनी व त्यांच्या मदतनिसांनी सहभाग घेतला होता. 22 पुरुष व 15 महिला मुलींनी सहभाग घेतला होता तर अनेक दिव्यांग हे कुबडी व काठीच्या सहाय्याने सहभागी झालेले दिसून आले. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक, हिंद महासागरातील अरबी समुद्र व बंगालच्या खाडीचा त्रिवेणी संगम, रामेश्वरम् येथील रामेश्वरम् ज्योतिर्लिंग धनुष्य कोडी रामसेतू तर मदुराई येथील मीनाक्षी मंदिराला या दिव्यांगांनी भेटी दिल्या.14 मे ला छत्रपती संभाजी राजेंची जयंती वाट्टाकोटाई किल्यावर साजरी केली आणि मातृदिनानिमत्त सहभागी मातांचा सत्कार केला.संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी उत्तम आयोजन केले.सचिव कचरू चांभारे यांनी या मोहिमेस उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. इतर सर्वच नॉर्मल असणाऱ्या सहभागीनी सर्वांना मदत केली. एकमेकांना सहकार्याने मोहीम यशस्वी झाली.मोहिमेतील सहभागी दिव्यांग व मदतनीस
शिवाजी गाडे, कचरू चांभारे, अंजली प्रधान, सुनील पवार, गुलाब महाले, सतिष अळकुटे, कल्याण घोलप, सुवर्णा गजभिये, काजल कांबळे, प्रियंका देशभ्रतार, शबाना पखाली, रघुनाथ सातव, सुनील वानखेडे, अर्जुन शिरोळे ,विवेक गुंड ,संतोष पालवे, चेतन रत्नपारखी, विक्रांत उपासनी, ओम तारू ,दत्तात्रय साळी, अश्विनी चांभारे ,कविता पवार ,वैशाली भालेकर, शिवराम पवार ,एकनाथ भालेकर, संतोष बटुळे ,निकिता बटुळे, दीपक गायकवाड, अश्विनी तारू ,अर्चना ढिले, खुशी गाडे ,शांताबाई प्रधान, बाळकृष्ण पवार ,चंद्रगुप्त रोकडे, प्रतिभा रत्नपारखी, चेतना उपासनी, या सर्वांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here