आविष्कार अभय शिंदे ह्याची सीबीएससी परीक्षेत उंच भरारी                                

0
275

आष्टी प्रतिनिधी   सन 2022..23 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पुणे,ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आणि आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख, डॉ.अभय शिंदे यांचे चिरंजीव आविष्कार शिंदे याने 96 टक्के गुण मिळवून उंच भरारी घेतली आहे.आविष्कारचे आजोबा बलभीमराव शिंदे सेवानिवृत्त शिक्षक आहेत.आणि आजी ह्या सुद्धा शिक्षकी पेशेतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आविष्कारचे आई-वडील हे दोघेही शिक्षकी पेशात आहेत.त्यामुळे आविष्कार वर शिक्षणाचे विशेष संस्कार झाले.
शिंदे कुटुंब हे मूळचे आष्टी तालुक्यातील आष्टा या गावचे असून आज ते कडा येथे वास्तव्यात आहेत.आविष्कार शिंदे यांचे पुढील शिक्षण पुणे येथेच होणार असून त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य अविनाश कंदले,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,सर्व प्राध्यापक,कर्मचारी,तसेच डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी आविष्कारचे अभिनंदन केले.त्याच्या निवासस्थानी  आविष्कार शिंदे ह्याचे अनेकांनी अभिनंदन केले,यावेळी,आई..वडील,आजी.आजोबा हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here