बीड प्रतिनिधी
शिरुर तालुक्यातील आर्वी येथे आज बुधवार (दि.०३) पासून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. गावातून शोभायात्रा काढून संत, महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी व विणा, टाळ पूजन केले झाली आहे.
संतकुलभूषण नगद नारायण महाराज यांच्या कृपेने, वै. स्वामी निगमानंद महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मत्स्येंद्रनाथ संस्थानचे मठाधिपती महंत स्वामी जनार्दन महाराज यांच्या नेतृत्वात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३ मे २०२३ रोजी शोभायात्रा काढून संत महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करुन सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. सप्ताहात काकडा, विष्णूसहस्त्रनाम, तुकाराम महाराज गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ किर्तन अशा कार्यक्रम हाेणार आहेत. दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत विजू महाराज सुलाखे यांचे गित रामायण होणार आहे.
नारायण महाराज डिसले, पांडुरंग महाराज भिंगले, विजयकुमार गाडेकर, महंत सुरेश महाराज, राम पाटील देवकर, एकनाथ महाराज पुजारी, वे.शा.सं बाळुदेव मुळे यांची प्रवचने होणार आहेत तर, उद्धव महाराज शास्त्री, अतुल महाराज शास्त्री, भानुदास महाराज शास्त्री, श्रीरंग स्वामी तळेकर, गुरुवर्य शिवाजी महाराज नारायणगडकर, रामश्वेर महाराज शास्त्री, महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंद सरस्वती यांची किर्तने होणार आहेत. १० मे २०२३ रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत मत्स्येंद्रनाथ संस्थानचे महंत स्वामी जनार्दन महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन गावक-यांच्या वतीने करण्यात आले आहे.