गेवराई प्रतिनिधी
शहरातील संतोष नगर भागात असलेल्या किराणा गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचा किराणा साहित्य आगेत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे
या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की गेवराई शहरातील संतोष नगर भागात कैलास (बबलू) लोया यांच्या लोया एजन्सीच्या किराणा गोडाऊन ला
आज दि. 27 गुरुवार रोजी दुपारी अचानक आग लागली याआगिचा भडका येवढा तिव्र होता की या आगेत लाखो रुपयांचे किराणा साहित्य काही शनात जळून खाक झाले
हि आग पाहताच गोडाऊन मालका सह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग वीझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग विझली नसल्याने अग्निशामक बोलण्यात आले अग्निशामकाच्या मदतीने आगेवर नियंत्रण आले असले तरी गोडाऊन मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हि आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/04/IMG-20230427-WA0073-1024x768.jpg)