परळी येथील ऐतिहासिक नासरजंग साहेब दर्ग्याच्या इनामी जमीनी मालकी ताब्यात देऊन ७/१२ कोरी करा

0
376

सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण

बीड़ / प्रतिनिधी
परळी व येथील ऐतिहासिक देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बऱ्याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आमरण उपोषण सुरू आहे.
सविस्तर असे की परळी व येथील ऐतिहासिक देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बऱ्याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे प्रकरणी जिममंदर असलेले न प परळीचे मुख्याधिकारी दुय्यय निबंधक, तहसीलदार व या कामी मदत करणारे सर्व अधिकारी यांच्यावर तात्काळ व कठोर कार्यवाही करून त्या जमिनी देवस्थान परत देवस्थान देण्यात याव्या व बोगस पी आय कार्ड तात्काळ बाद करावी या मागणी माजलगाव येथील माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू यांचे असंख्ये कार्यकर्ते समवेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे
या विषयी सविस्तर वृत्त असे की, परळी शहरामधील दर्गा नासरजंग ची इनामी जमीनीवर बेकायदेशीर सी.टी.सर्व्हे करून पी.टी.आर. वर इतर लोकांची नांवे नोंद घेण्यात आलेली आहे.त्याच प्रमाणे ७/१२ वर देखील बोगस कागदपत्र तयार करून भूमाफीयांशी संगणमत करून धन धांडगे लोकांची नावे नोंदविण्यात आली आहेत. भूमाफियांनी आपल्या पैशाच्या व राजकीय जोरावर अधिकारी लोकांना हाताशी धरून शासनाची व देवस्थानाची फसवणूक केलेली आहे.. भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, मुख्याधिकारी नगर परिषद व परळी तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासन जी. आर. प्रमाणे सर्व फेरफार तात्काळ रद्द करुन व वादग्रस्त ७/१२ कोरी करून मालकी रकान्यामध्ये दर्गा नासरजंग अशी नोंद घेण्यात यावी.
त्याचप्रमाणे भूमिअभिलेख कार्यालयाने जो मोठा गोंधळ निर्माण केलेले आहे त्याची सुध्दा चौकशी करण्यात यावी तसेच भूमिअभिलेख कार्यालया कडून जे बोगस पी आय कार्ड देण्यात आले याची ही कसून चौकशी करावी या साठी आम्ही आज दि. २७ एप्रिल पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करत आहोत या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील असे ही माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सलिम बापू यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि २० एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले होते.
तरी सदरील प्रकरणात कसलीही कायदेशीर कार्यवाही न झाल्याने आज सकाळपासून सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे यावेळी. एड.सय्यद अल्ताफ,शेख महमूद,शेख इलियास मासूम,पठाण अमरजान,सय्यद समीर सय्यद सलीम, महमूद यासीन बेग,शेख महबूब इमाम,शेख मुबारक आदी मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

वरील बातमी ही आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात यावी ही नम्र विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here