घर खर्चाला पैसे देत नसल्याने मुलानेच केला बापाचा खून

0
1485

ताडबोरगाव येथील घटना
घटनेने तालुक्यात सर्वत्र उडाली खळबळ

मानवत / प्रतिनिधी.
वडील घरी खर्चाला पैसे देत नसल्याने दारू पिवून पैसे उडवत असल्याचा राग मनात धरुन मुलानेच आपल्या बापाच्या कुऱ्हाडेने मानेवर व खांद्यावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील ताडबो रगाव येथील दत्तात्रय देवीदास भोकरे असे मयताचे नाव आहे. आरोपी मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे याच्या विरोधात मानवत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. बाबासाहेब दत्तात्रय भोकरे यांनी मानवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २४ एप्रिल रोजी रात्री ९ ते २५ एप्रिल रोजी सकाळी १२:४५ वाजेनेचा दरम्यान ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात दत्तात्रय देवीदास भोकरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. मानवत पोलिस स्टेशनंचे बिट अंमलदार पोह भारत नलावडे , नामदेव पवार, राजु इंगळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली मयत व्यक्तीची संपूर्ण माहिती काढली असता त्यात हा मृत्यू म्हणजे खूनच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस यातील आरोपी परमेश्वर भोकरे याने त्याचे वडील दत्तात्रय देविदास भोकरे हे घर खर्चाला पैसे न देता त्यांच्या मित्रासोबत दारू पिवून पैसे उडवत होते याचा राग मनात धरुन त्यांची कुऱ्हाडीने घातक हत्याराने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारहाण करुन खून केला, या बाबत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक ही करण्यात आलेली आहे. मानवत पोलिस स्टेशनंचे पोलीस निरिक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे हे पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळास परभणी पोलीस अधीक्षक आर. रागसुधा आर, उप विभागीय पोलीस अधिकारी गोफने, यांनी भेट दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here