उपळी शेख एजाज
मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडत आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. रविवारी (दि.१० ) रात्रीनंतर वडवणी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. यामध्ये वादळी वाऱ्याने उपळी येथील किशन कडाजी इचके यांच्या घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने घरात असलेल्या त्यांच्या पत्नी कमलाबाई किशन इचके 68 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. वडवणी तालुक्यातील उपळी येथे काल दिनांक १९/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट चालू असताना अचानक घराची भांत कोसळली व घरावरील पत्रे सर्वत्र उडून गेले सदर पत्राच्या व भिंतीच्या ढिगाऱ्याखाली कमलाबाई किसन इचके हे दाबल्या गेल्या त्यांना शेजारील लोकांनी बाहेर काडले तर त्यांना बऱ्याच ठिकाणी मार लागला होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सदरील घटनेमध्ये महिला गंभीर जखमी असून गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.