नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नाभिक एकता महासंघ प्रदेशाध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्यांचे राज्यमंत्री मा. श्री कपिल पाटील साहेबांना निवेदनाद्वारे समाजातील अडचणी व्यक्त करण्यासाठी आ. सौ. निर्मला ताई व इतर मान्यवरांनी केले अतोनात प्रयत्न.
राज्यांचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नाभिक समाजाच्या विकासासाठी संत सेना केश शिल्पी महामंडळाची स्थापना करून नाभिक समाजाच्या मागण्या करता महत्वपूर्ण पाऊल उचलले. या साठी नाभिक एकता महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. भगवान (आण्णासाहेब ) बिडवे यांच्या आदेशानुसार आज ठाणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधव मा. बळीराम भोईर साहेब, प्रशांत लाड साहेब, प्रफुल्ल खंडागळे साहेब, मोरेश्वर जाधव साहेब, हरिश्चंद्र लाड साहेब, अक्षरा लाड ताई, सर्व पदाधिकारी वसई, विरार, मुरबाड, पडगा, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पुर्णा, आनगाव, असे अनेक ठाण्यातील ग्रामीण भागातील नाभिक एकता महासंघाचे सर्व पदाधिकारी, समाजातील महिला पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते. ठाणे जिल्ह्यातील राज्य मंत्री मा. श्री कपिल पाटील साहेब यांना निवेदन देऊन त्यांचें अभिनंदन करण्यात आले. नाभिक समाजाच्या सर्व मागण्या मान्य करतील असे आश्वासनही साहेबांनी दिलें. त्या वेळी समाजातील महिला भगिनी व बांधव बहुसंख्येने हजर होते.