डॉ. तुषार हाकाळे हे तांदळा गावातील पहिले एमबीबीएस चे मानकरी

0
223

तांदळा(प्रतिनिधी)
गेवराई तालुक्यातील तांदळा येथील श्री हरीभाऊ तुळशीराम हाकाळे (शिक्षक) यांचे चिरंजीव डॉ. तुषार हे एमबीबीएस पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. तांदळा गावामधून एमबीबीएस चे शिक्षण घेतलेले हे पहिले मानकरी ठरले आहेत. त्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. तुषार यांचे शिक्षण 1 ते 4 थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळा येथे त्यांच्या मूळ गावी झाले. तर पुढील शिक्षण 5 ते 10 वी चंपावती विद्यालय बीड, 11-12वी जय भवानी उच्च माध्यमिक विद्यालय गढी व एमबीबीएस डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे पूर्ण झाले.


चौकट
मला मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरामधून माझे अभिनंदन होत आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माझे आई-वडील व माझ्या गुरुजनांचे आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मी अतिशय प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करेन. मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
-डॉ. तुषार हरिभाऊ हाकाळे.
डॉक्टर तुषार यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक व सर्व हितचिंतक यांच्यासह गावकऱ्यांकडून कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here