आ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज पवारांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा संपन्न

0
212

गेवराई ( प्रतिनिधी ) देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर गेवराई विधानसभा मतदारसंघचे आमदार अॅड लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज पवारांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.5 रोजी कोल्हेर रोड गेवराई भाजपा कार्यालयापासून सायंकाळी ६:०० वाजता सावरकर गौरव
यात्रा संपन्न झाली आहे
यावेळी युवानेते शिवराज दादा पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,भाजपा शहराध्यक्ष याहीया खाॅन, मा.नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, भगवान घुबार्डे, देविदास फलके, बळीभाऊ करे, ईश्वर पवार, राजेद्र भंडारी, शाम कुड, संजय जाधव, ब्रम्हदेव धुरंधरे, कृष्णा मुळे, भरत गायकवाड, आप्पासाहेब कानगुडे, राम पवार, किशोर धोडलकर, अरुण मस्के, अमोल मस्के, समाधान मस्के, उध्दव रासकर, गोपाल चव्हाण, संदिप लगड, शरद मोटे, प्रल्हाद येळापुरे, कृष्णा पाटोळे, दाऊद पठाण, अशोक खरात,लक्ष्मण चव्हाण, पिटु साळवे, प्रकाश उपळकर, राम तात्या पवार, नितीन शेट्टे, गोरख मोटे, संतोष काळे, विशाल सुर्डीकर, मनोज हाजारे,बाबा खराद, बाळासाहेब गायकवाड, नंदु गरड,शरद कादगे, रजित खाजेकर, प्रशांत राख, विनायक गिरी, विशाल धर्माधिकारी, आदि उपस्थितीत होते
सावरकर गौरव पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी 30 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा संकल्प भाजपा आणि शिवसेनेने सोडला आहे. तसेच राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’ सुरु करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. वारंवार सावरकरांचा होणारा अपमान लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता येईल, यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या सावरकर गौरव यात्रेच्या पार्श्वभूमी वरून गेवराई विधानसभा मतदारसंघचे आमदार अॅड लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दि.5 रोजी कोल्हेर रोड गेवराई भाजपा कार्यालयापासून सायंकाळी ६:०० वाजता ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. या सावरकर गौरव यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here