गेवराई प्रतिनिधी
गेवराई शहरात भरदिवसा मंदिरातील पितळी घंट्या व ईतर वस्तु सह मंदिर परिसरातील एका घरातील नगदी रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे
या घटने संबधीत सविस्तर व्रत्त असे की गेवराई शहरात मध्य वस्तीत असलेल्या बोर्डे गल्ली मधे निळकंठेक्ष्वर,महादेवाचे पुरातन मंदिर आहे या मंदिरात पुरातन अंदाजे 10 कि वजनाचा पितळी घंटा होता व ईतर पितळी दिवे होते अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा चोरुण नेले आहे ,
याच मंदिर परिसरात विलास,मुरलीधर बुगदाने,यांचे घर आहे दि 31 रोजी घरातील व्यक्ती कामा निमीत्त कुलुप लावुन बाहेर गेले याच संधिचा फायदा घेत चोरट्यानी घराच्या मागच्या बाजुने आत प्रवेश करुण कपटाचे दार तोडुन तिजोरीतील अंदाजे 30 हजार रु रोख रक्कम लाबवली चोरटा पसार झाला परंतु चोरी करुण पळ काठल्या नंतर त्याने स्वताची चप्पल त्या ठिकानी सोडुन पळाला आहे दुपारी, बुगदाने घरी परत आल्यावर घराचे कुलुप उघडुन प्रवेश केल्यावर तिजोरीचे दार उघडे दिसले पाहणी केल्यावर घरात चोरी झाल्याच दिसले या संबधी गेवराई पोलीसात रितसर तक्रार दिली घटना स्थळी येवुन पोलीसांनी पंचनामा केला परंतु दोन दिवस थांबा मग गुन्हा दाखल करू असे सिगीतले त्यामुळे पोलीस प्रशासणाला चोरीचे गांभीर्य आहे की नाही अशी चर्चा नागरीकात होत आहे