सकारात्मक बदलाचा सकल समाजाला फायदा होतो – न्यायमूर्ती रविन्द्र बोर्डे

0
162

उत्साहात पार पडला गौरव सोहळा

गेवराई प्रतिनिधी

समाजात विविध स्तरांवर बदलाची गरज असते आणि या बदलाच्या स्थित्यंतरातून नवे दृष्टिकोन स्वीकारावे लागतात. ती काळाची गरज असते. त्याच बरोबर, सकारात्मक बदलाने चांगल्या नितीचा समाज उभा राहतो, असे प्रतिपादन न्यायाधीश रविन्द्र बोर्डे यांनी येथे बोलताना केले.
ज्येष्ठ विधिज्ञ
मदनलाल इंदानी यांच्या अमृत महोत्सवा निमित्त , गुरूवार ता. 23 रोजी सायं सात वाजता
मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

गेवराई तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तथा न्यायालयीन क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान देणारे तालुक्याचे भुमिपुत्र एम.एस.इंदानी यांच्या अमृत महोत्सवी जन्म वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये दि. 23 मार्च रोजी चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप महाराज घोगे , माजी मंत्री शिवाजीराव पंडित , छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे न्या. रवींद्रजी बोर्डे, वसंतराव साळुंके, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शहादेव ननवरे, नगराध्यक्ष सुशील जंवजाळ यांची उपस्थिती होती.
श्री. इंदानी यांना मानपत्र देऊन अमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना श्री. न् बोर्डे म्हणाले की,
यांनी समाजात विविध स्तरांवर बदलाची गरज असते आणि या बदलाच्या स्थित्यंतरातून नवे दृष्टिकोन स्वीकारावे लागतात. ती काळाची गरज असते. त्याच बरोबर, सकारात्मक बदलाने चांगल्या नितीचा समाज उभा राहतो, असे ही प्रतिपादन त्यांनी बोलताना केले.
या कार्यक्रमास गौरव समितीचे ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी मोटे, गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष शेख जमादार, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट अमित मुळे, मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष सुरेश वाघचौरे, सचिव एडवोकेट सचिन गंडले, प्रसिद्ध उद्योजक प्रकाशचंद्र अट्टल, डॉ. आबेद जमादार, अॅड शेख अब्बास, डॉ.बी.आर.मोटे, युवा उद्योजक गणेश नलवडे, प्रसिद्ध उद्योजक, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बरकसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र राका, अॅड सुभाष निकम, भाजपा ओ.बी.सी.चे जिल्हा उपाध्यक्ष अरुणलाल लिंबोरे, युवानेते संजय काळे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, आयुब बागवान, शेतकरी नेते नाना पवार, शिवसेना तालुकाप्रमुख शिनु भाऊ बेदरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार सुशील टकले यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर बी.आर. मोटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here