गेवराई (वार्ताहर)राम मंदिर संस्थान गेवराई इथे उमरखेड संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज, श्रीराम संस्थान साडेगावचे मठाधिपती परमपूज्य सुरेश महाराज रामदासी, शंकरानंद स्वामी मठ केसापुरीचे मठाधिपती परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होणार असून त्यानिमित्त दि.२७ मार्च रोजी त्यांचे आगमन होणार आहे.शिष्यगणांच्या वतीने सामुदायिक पुडीचा व परमपूज्य महाराजांच्या अमृत महोत्सव निमित्त ७५ तुलेचा भव्य दिव्य कार्यक्रम राम मंदिर संस्थान राम मंदिर गल्ली येथे आयोजित केला आहे. तरी सर्व गुरुबंधूंनी व भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गेवराई तालुका शिष्य गणांच्या वतीने करण्यात आले आहे.
दि.२७ मार्च रोजी उमरखेड संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज,श्रीराम संस्थान साडेगावचे मठाधिपती परमपूज्य सुरेश महाराज रामदासी, शंकरानंद स्वामी मठ केसापुरीचे मठाधिपती परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.दि.२७ मार्च रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत परमपूज्य माधवानंद महाराजांच्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ तुलेचा भव्य दिव्य कार्यक्रम राम मंदिर संस्थान राम मंदिर गल्ली येथे आयोजित केला आहे. त्यानंतर १० ते ११ या वेळेत श्रीरामाची महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापना व कलशारोहण संपन्न होईल.त्यानंतर लगेच दर्शनाची वेळ असणार आहे.दुपारी १२-३० वाजता लिंग दर्शन होईल.महाप्रसाद दुपारी १ ते ५ या वेळेत राहील.सायंकाळी ५ ते ६ उर्वरित तुलेचा कार्यक्रम होईल.सायंकाळी ६ वाजता तुकाई महिला मंडळांचे महाराजांच्या अमृत महोत्सव निमित्त दीपोत्सव होणार आहे.त्यानंतर सायंकाळी ६- ३० ते ८ प्रदोष पूजा व लिंगदर्शन होणार आहे. महाराजांचा मुक्काम १ दिवस असणार असल्याने व कार्यक्रमांची रेलचेल असल्याने सर्व कार्यक्रम वेळेवर होणार आहेत. तरी सर्व भावीक भक्तांनी परमपूज्य माधवानंद महाराज यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम रायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कलशारोहणाचाा दैदिप्यमान सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन गेवराई तालुका शिष्यगणातर्फे करण्यात आलेले आहे.
Home Uncategorized उमरखेड संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद महाराज यांचे २७ मार्च रोजी गेवराईत आगमन...