‘बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम’!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
/ छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शाळेतील वंचित दुर्बल घटकातील 50 मुला मुलींना कामगार व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय किटचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी अजंता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण चाबुकस्वार, दैनिक लोकमतचे शांतीलाल गायकवाड, दैनिक सकाळचे अनिलकुमार जमदाडे, शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.भामरे, एनजीओचे अध्यक्ष रामदास वाघमारे,मीरा वाघमारे, देविदास बुधवंत, ऋत्विक वाघमारे यांच्या हस्ते शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक किटमध्ये खाऊ, एनजीओची बॅग,पॅड, कंपास बॉक्स, चित्रकलेची वही, रंगपेटी,पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, पट्टी पेन्सिल,वह्या,एक पुस्तक असे एकूण बारा साहित्याचा समावेश आहे.
‘उज्वल भविष्य’ हा उपक्रम बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शालेय किटचे वाटप करण्यात आलेले आहे. फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम राबविण्यात येतोय.गेल्या आठ वर्षापासून वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटची भेट देण्यात येत आहे.पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना ‘उज्वल भविष्य’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक मदतीबरोबरच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही फाऊंडेशन उचलत आहे. अशा विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य उज्वल करण्यासाठी फाऊंडेशन मदत करत आहे. वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून भरकटला गेलाय.अशा या मुलांच्या ‘उज्वल भविष्यासाठी’ बोधी फाऊंडेशन पुढाकार घेत आहे ही बाब ‘जीनियस’ आहे असे उदगार कामगार व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी काढले. ‘उज्वल भविष्य’ हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम बोधी फाऊंडेशन राज्यभर राबवित आहे. अशा विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी बोधी फाऊंडेशन हे कार्य तन मन धनाने करीत आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे मीरा वाघमारे यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे प्रतिपादन डॉ. प्रवीण चाबुकस्वार यांनी काढले. प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. भामरे म्हणाले की, बोधी फाऊंडेशन संस्था खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे ‘उज्वल भविष्य” व्हावे पुढे मोठेपणी या विद्यार्थ्यांनी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहून आई-वडिलांचा भक्कमपणे आधार बनावे हा या संस्थेचा एकमेव उद्देश आहे.
पुढे खिरोडकर म्हणाले की,सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक अभिनव उपक्रम ही संस्था राबवीत आहे. अशा या अभिनव कार्यासाठी समाजामधून अनेक मदतीचे हात पुढे यायला हवेत. आणि समाजातील ही दरी दूर करायला हवी.