औरंगाबाद प्रतिनिधी
“तो”जि.आर.रद्द करा,मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी
शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या नऊ खाजगी कंपन्या मार्फत करण्याचा निर्णय हा घटनाविरुद्ध असून तो तात्काळ रद्द करावा,अशी मागणी सोमवारी विभागीय आयुक्ता मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे नॉन पॉलिटिकल ओबीसी,एससी,एसटी सोशल फ्रंटतर्फे निवेदना द्वारे करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात ऍड.महादेव आंधळे,विष्णू वखरे,पंडीत तुपे,दौलत झरे,अरुण जाधव,जी एस दोडवे,हनुमान गवळी,कांचन सदाशिवे व पुष्प घोडके आदींचा समावेश होता.महाराष्ट्रात जातवार जनगणना करण्यात यावी,सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करावे,निवडणुका ईव्हीयम द्वारे घेण्याची पद्धत रद्द करावी
रविवारी जेष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या शासन आदेशावर सर्विस्तर चर्चा करून आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.