गेवराई प्रतिनिधी
अर्थक्षेत्रात आगळी -वेगळी छाप सोडलेल्या तसेच गेवराई या मुख्य शाखेसह महाराष्ट्रभर 21 शाखेचे जाळे निर्माण करणा-या व बॅकींग सेवेसोबत सामाजिक उपक्रमांत सदैव आग्रेसर असणा-या छत्रपती मल्टीस्टेटने 8 मार्च 2023 रोजी महिलादिनाचे औचित साधून काही कर्तुत्ववान महिलांचा सत्कार केला.यावेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सौ.आरती संतोष भंडारी यांची तर प्रमुख आतिथी म्हणून सुमनांजली बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सत्कारमुर्ती म्हणून धोडराई गावच्या नवनिर्वाचित सरपंच शितल साखरे,कोविड काळात वैद्यकीय सेवा देणा-या डाॅ.रचना मोटे,विमला विद्यामंदीर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना हिरे मॅडम,सरकारी दवाखन्यातील सोनोग्राफी विभागातील निलम वळवी,तसेच पिठाची गिरणी चालवून मुलांचे शिक्षण व संसारगाडा ओढणा-या शारदाताई धालगडे या सर्व महिलांचा शाल,हार,व सन्मानचिंन्हासह सन्मान करण्यात आला.त्यावेळी सर्व सत्कारमुर्तीने मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये छत्रपती मल्टीस्टेटने केलेल्या महिला सन्मानाचे कौतुक केले.आर्थिक क्षेत्रात महिलांचे योगदानही पुरूषापेक्षा कमी नाही.आर्थिक बचतीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असतो.आणि अर्थ वाहिनी असलेल्या छत्रपती मल्टीस्टेटने हीच गोष्ट लक्षात घेऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केलेल्या “नारी गौरव” हा सोहळयाचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले.या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन माधव चाटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष सुतार यांनी केले.या कार्यक्रमांचे नियोजन संस्थेतर्फे आविनाश माळवदे यांनी केले होते.