पोलिस दल आणि पोलिस दलातील कर्मचारी बहुतेक करून त्यांचा संवेदनशील, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख, चेहरा आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणा-या पोलिस अधिका-याच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा लेख.शासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही गोष्ट असो कर्तव्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेले काम आणि जनतेची सेवा आपण पाहिले आहे. पोलीस प्रशासनाची ख्याती मोठी असुन ही ख्याती मिळवण्यासाठी पोलिसांचे अविरत परिश्रम, जीवाची बाजी लावून काम करणयाची प्रवृत्ती, कर्तव्यापलिकडे जात केलेली जनसेवा या गोष्टी कारणीभूत आहेत. कोरोना व्हायरस संकटकाळात पोलिसांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र केलेले काम आणि कर्तव्यापलिकडे जात जनतेची केलेली सेवा आपण अनुभवली आहे. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतही पोलिसांचे कार्य सुरुच होते. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील वरुड या छोट्याशा गावचे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातून पोलीस अधिकारी पदाचे स्वप्न पूर्ण करून सन 2006 साली पोलीस उपनिरीक्षक पी.एसआय या पदावर संतोष तेजराम जंजाळ हे नाव झळकले आणि आई- वडील, मित्रपरिवार, नातेवाईक अपेष्ट यांना खूप आनंद झाला कारण की आपला सहकारी आपला मुलगा, माझा नातेवाईक एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस खात्यात रुजू झाला. सर्वत्र अभिनंदन केले तसेच दि. 26 /11/ 2006 साली यांनी पोलीस खात्यात म्हणून पदभार स्वीकारला शेतकऱ्यांचा मुलगा पि. एस. आय पदापर्यंत पोहोचू शकतो याचे उदाहरण म्हणजे संतोष जंजाळ सर आहेत. पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्य करत असताना जालना बुलढाणा वाशिम आणि आता बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पोलीस ठाणे येथे ए. पी.आय म्हणून त्यांची कार्य तत्परता अखंडपणे सुरू आहे अडल्या-नडल्यांना गोरगरीब माणसांना समजावून सांगत प्रत्येक समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे सर्वांशी आपलेपणाने वागून मितभाषी, शांत स्वभावानं सर्वांशी आपुलकीने बोलणारे पोलीस खात्यातील एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून अशी त्यांची ख्याती प्राप्त झाली. सर्वसामान्य माणसाला योग्य तो न्याय मिळवून देण्याचा उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झालंय आहे गेवराई तालुक्याला खाकीतील खमक्या अधिकारी लाभला हे एक गेवराईकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. सरांची शिस्त जरी कडक असली तरी मन मात्र निखळ मनासारखं गोड आहे म्हणून त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख हा भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो आणि गेवराई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात काम सुरू झाल्यापासून अनेक गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. माझे सहकारी मित्र शुभम काळे हे जंजाळ सरांच्या अगदी जवळचे विश्वासू सदस्य आहेत ते जंजाळ सरांच्या कार्याबद्दल नेहमीच चर्चा करत असताना सर खूप प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीने काम करतात असे ते नेहमी सांगत आहेत. सरांचा आदर्श आपण नवतरुणांनी घेतला पाहिजे आज एक संदेश शुभम काळे त्यांच्या शब्दशैलीतून देत आहेत जंजाळ सरांचे मार्गदर्शन खूप मोलाच्या आहे ते स्वत:ला कमी न लेखता ताठ मानेने जगा, असा संदेश देताना प्रत्येक कॉन्स्टेबलला आदराची वागणूक देण्यासही ते स्वत: कधीही विसरले नाहीत.पोलिस दलात काम करत कर्तव्यापलीकडे जाऊन भरीव योगदान ते नेहमी देतात. गेवराई पोलीस ठाण्याच्या वतीने अनेक उपक्रम त्यांनी राबवले जंजाळ सरांनी प्रभावी कामगिरी करून दाखवले आहे. यातून गेवराई येथील नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढला असून यातुन. आपल्यावरील विश्वास एक अतूट नातं बनलं आहे परंतु काही ठिकाणी आपण आपला खाक्या दाखवलाच पाहिजे हे मात्र निश्चित खरं आहे. जंजाळ सर “लेट पण डायरेक्ट थेट शब्दातून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. खरंच सल्यूट आपल्या कार्याला जय हिंद जय महाराष्ट्र..!!
लेखक:- शुभम घोडके मो.8308390008 (उपसंपादक)