कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या सेवापुर्तीत गुरुजनांचा भव्य सत्कार
आष्टी प्रतिनिधी
वयाच्या 58 व्या वर्षी 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी आपल्या पहिली ते पदवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षक गुरुजनांचा भव्य सत्कार करून समाजापुढे गुरु श्रेष्ठत्वाचा नवा आदर्श ठेवला आहे.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे इयत्ता अकरावीत प्रवेश घेऊन तेथेच हिंदी विषयाची अध्यापन सेवा पूर्ण करून 33 वर्षाच्या निवृत्तीनंतर सेवापुर्ती सोहळ्यात छाया गोविंदराव गरगडे,डी.जी.देशपांडे,संभाजी नवसुपे,संपतराव गायकवाड,दिगंबर खांडके, शेख फरीद शेख चांद,प्रा.विश्वनाथ शिंदे, प्रा,डी.वाय.चाळक,प्रा.रामकृष्ण हंबर्डे, प्रा.नामदेव पालवे यांच्यासह मधुकर सोळसे,एकनाथ धोंडे,तसेच तळ्याच्या कामावर मजुरी करताना मार्गदर्शन करणारे मुकादम गुरु रामचंद्र बाबा पोकळे यांचा संस्थाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,माजी आमदार भीमराव धोंडे, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते फेटा बांधून,सन्मान चिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,प्रा.जे.एम.पठाण, प्रा.अशोक भोगाडे,प्रा.दिलीप घायाळ,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव, कवी हरीश हातवटे,डॉ.अभय शिंदे,मधुकर सोळसे यांनी कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.या सेवापुर्ती सोहळ्याला पत्रकार, शिक्षक,प्राध्यापक,विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक,चिंचाळा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.रवी सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.