जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड शहरातील कारागृहात महिला बंदींना साडी भेट
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
प्रजापिता ब्रम्हकुमारी शिवप्रिया बहिण जी नीं घेतला आगळावेगळा कार्यक्रम…..
नांदेड: प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र कैलास नगर नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्हा कारागृहात दि. 8-2-2023 रोज मंगळवार महिला बंदिना साडीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ब्रम्हकुमारी शिव प्रिया बहीण जी यांनी बंदीस्त महीलांना ईश्वरीय ज्ञान व राजयोग याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करून त्यांना इतर विषयांवर वक्तव्य करून मनोबल वाढवले.तसेच एकाग्रता ईश्र्वराशी एक रुप होण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे असेही सांगितले. एकाग्रता करण्याची पद्धत उपाय सांगितले उपस्थित सर्वांनी एकाग्र होऊन ईश्वरीय अंशांची अनुभुती घेतली.
यावेळी कारागृह अधीक्षक मा. श्री सुभाष सोनवणे, सेवाकेंद्राकडुन बिके अल्का माता, मिरा माता, बिके नागनाथ भाई महादापुरे, शुभम भाई कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इतर सर्वांनी बंदीस्त महीलांचे मनोबल वाढेल अशी शिकवण देण्यात आले…..